मुख्य सामग्रीवर वगळा

पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी विकास जगताप यांची नियुक्ती

 पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी विकास जगताप यांची नियुक्ती.

सोलापूर - पत्रकारिता एक विचार ध्यास चळवळ समजून पत्रकारांच्या अडचणीत नेहमीच धावून जाणारे दिवा (जिल्हा ठाणे ) येथील क्राईम सूत्र चे सह संपादक विकास जगताप यांची पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Samti

  पत्रकारांच्या प्रश्नाची जाण असणारे आक्रमक पत्रकार म्हूणन विकास जगताप यांनी आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली असून परखड लेखन व सडेतोड बातमी मुळे विकास जगताप यांच्यावर हल्ले देखील झाले असून त्यांच्या लेखणीने कधीच खच खाल्ली नसून उलट नव्या दमाने त्यांचे विचार क्राईम सूत्र वृत्तपत्र च्या माध्यमातून मांडत आहेत भटक्या विमुक्त संघर्ष समिती च्या माध्यमातून समाजातील प्रश्न थेट मंत्रालयात जाऊन सोडवण्याच्या त्यांनी नेहमीच प्रयत्न करत असल्याने उत्कृष्ट समाजसेवक म्हूणन त्यांनी नावंलौकिक मिळवला आहे.

 त्यांच्या निवडीने पत्रकारांमध्ये नवंचैतन्य निर्माण झाले असून तळागाळातील पत्रकारांचे प्रश्न मंत्रालयात मांडणारा पत्रकार म्हूणन त्यांची ख्याती असून पत्रकारांच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याची धमक असणार उमदा युवा पत्रकार विकास जगताप यांच्या निवडीने पत्रकारांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले.

 असून या निवडीने प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे  मराठवाडा कार्याध्यक्ष यशवंत कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे सरचिटणीस मनोज जैन सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे  उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन ताकमोघे   संघटक दिनेश सलगरे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ  जालना जिल्हा अध्यक्ष गोपाळ त्रीवेदी  गडचिरोली जिल्हा अध्यक्ष देवेश पेंदापल्लीवार रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन   जाधव 
भटका विमुक्त संघर्ष समिती सोशल मीडिया प्रमुख (संपादक जागृक लोकमत)

श्री नितीन उमाजी चव्हाण

महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे

भटके-विमुक्त संघर्ष समितीचे सोशल मीडिया सातारा जिल्हा प्रमुख श्री मंगेश सुभाष चव्हाण

श्री सुदेश सुभाष चव्हाण( फिल्मस्टार)

सोशल मीडिया उपप्रमुख (उपसंपादक जागृक लोकमत) श्री मोहन शिंदे.

पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री किसन सर्जेराव चव्हाण.

कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री सागर शेळके

मोहोळ तालुका सोशल मीडिया प्रमुख श्री शंकर शिंदे.

   श्री नितीन सर्जेराव चव्हाण(नागझरी)

यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोरगरीब रुग्णांसाठी भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष’चा पुढाकार

पुणे – प्रतिनिधी : कालिदास उबाळे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. निनाद संगिता मल्हारी टेमगिरे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकीय मदत व मार्गदर्शन करण्यात येत आहे. भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत “भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष” अंतर्गत महागड्या शस्त्रक्रियांसाठी धर्मदाय योजना, पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच विविध खाजगी ट्रस्ट यांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडली जाते. यामध्ये गरजू रुग्णांना अल्प दरात अथवा मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री सहायता निधी योजनेत कॉकलियर इम्प्लांट, हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, अस्थिमज्जा व हात प्रत्यारोपण, हिप व गुडघा बदल, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, डायलिसीस, कर्करोगासाठी किमोथेरपी/रेडिएशन, हृदयरोग, नवजात शिशूंचे आजार, बर्न व विद्युत अपघात अशा व...

पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन

पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन – विष्णुदादा भोसले पुरंदर : पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक वर्ग २ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे १२ फूट रुंदीचा रस्ता मंजूर करून पीडित शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान करण्यात आले आहे. ही कारवाई पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी आर्थिक तडजोडीतून अधिकाराचा गैरवापर करत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचप्रमाणे सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी खोटा स्थळ पाहणी अहवाल सादर करून संबंधित अर्जदारास मदत केल्याचा गंभीर आरोप आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात...

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना संस्थापक अध्यक्ष विजय जाधव

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना. पुणे : समाजातील गोरगरीब, भटक्या विमुक्त, वंचित व दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण सामाजिक पाऊल उचलले आहे. त्यांच्या संकल्पनेतून भैरव क्रांती सेना संचलित भैरव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण तसेच शहरी भागांतील भटक्या विमुक्त वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचा ठाम निर्धार या संस्थेमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. भैरव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, नैतिक मूल्यांची जोपासना तसेच सामाजिक जाणीव निर्माण करणारे विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहेत. शिक्षणाच्या प्रकाशाने प्रत्येक घर उजळावे आणि समाज सक्षम व्हावा, हा या संस्थेच्या कार्यामागील मू...